पुणे

नायफड, आसवालेवाडी मंडळास साहाय्य

CD

घोडेगाव, ता. १६ : नायफड (ता. खेड) श्री कमलजादेवी नाट्य व आसवालेवाडी (ता. जुन्नर) समाज प्रबोधन मंडळास घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने आर्थिक मदत केली आहे. यासाठी सोमवारी (ता. १५) येथील प्रकल्प कार्यालयात बैठक पार पडली.
पुणे जिल्ह्यातील आदिवासी कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नेहमीच सक्रिय भूमिका घेत असते. देहू आणि आळंदीसारख्या संत परंपरेच्या तीर्थक्षेत्राजवळ असलेल्या या भागातील आदिवासी गावांमध्ये भजन, कीर्तन, नाट्यकला आणि भारुड यांसारख्या कलांचा मोठा प्रसार आहे. मात्र, अनेक नोंदणीकृत गावपातळीवरील मंडळांना वाद्य आणि साहित्य खरेदीसाठी आर्थिक साहाय्य मिळत नसल्याने त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन, प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी दोन्ही मंडळांसाठी प्रत्येकी दोन लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
याप्रसंगी दोन्ही मंडळांनी कार्यालयाच्या आवारात त्यांच्या कलेचे सादरीकरण केले. प्रकल्प कार्यालयाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे आदिवासी कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांनी प्रकल्प अधिकारी देसाई यांचे आभार मानले. यापुढेही आदिवासी बांधवांना विविध कलागुण विकसनासाठी प्रकल्प कार्यालयाकडून संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन देसाई यांनी यावेळी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Malad News : मालाड क्रीक येथील मॅंग्रोव्ह वाचवण्यासाठी मुंबईकरांचे धरने प्रदर्शन..

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Manchar Protest : भावडी गावकऱ्यांचा सौर प्रकल्पाला विरोध; झाडांची तोड थांबवण्याची मागणी

त्यांचे चरण धुण्यापासून सगळं... 'चार दिवस सासूचे' मालिकेमुळे अभिनेत्रीला मिळालेला साईबाबांच्या आरतीचा मान; म्हणाली-

SCROLL FOR NEXT