पुणे

आदिवासी विभागात ३१ लाखांचा अपहार

CD

घोडेगाव, ता. ९ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसुचित जमाती दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना राबविण्यात आलेल्या फळ, भाजीपाला विकसित करण्याकरता शेडनेटची उभारणी करण्यात अनियमितता व शासकीय निधीचा अपहार झाल्याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यात ३१ लाख ३ हजार २१८ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाला आहे.
याप्रकरणी जुन्नर येथील आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठान लाइफ केअर लॅबच्या अध्यक्ष मिलिंद नामदेव मडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप आप्पाजी पाटील यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सन २०१३-१४ मध्ये आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळबाग लागवड करण्यासाठी योजना मंजूर केली होती. या योजनेअंतर्गत खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील ३७ लाभार्थ्यांसाठी काम मंजूर झाले होते. सदर योजना राबविण्याची जबाबदारी आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठान, लाईफ केअर लॅब, जुन्नर या संस्थेला देण्यात आली होती. योजनेसाठी एकूण ९० लाख ५४ हजार ९०० रुपये इतका निधी मंजूर झाला होता. संस्थेने रक्कम घेऊनही प्रत्यक्षात योजनेतील अनेक ठिकाणी कामे अपूर्ण राहिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. सन २०१९ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीत ३७ पैकी १५ ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर २०२१ व २०२२ मध्ये लाभार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या.
वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार चौकशी करण्यात आली असता संस्थेने शासनाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले. संस्थेकडून अपूर्ण कामांची रक्कम परत न करता उलट शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. सन २०२३ ते २०२५ या कालावधीतही वारंवार नोटिस बजावूनही संस्थेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर वरिष्ठ स्तरावरून कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार ८ जानेवारी २०२६ रोजी संबंधित संस्थेविरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास घोडेगाव पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

प्रेक्षकांचा अंदाज चुकला! 'स्वामी समर्थ' नाही तर कलर्स मराठीची 'ही' गाजलेली मालिका होतेय बंद; शूट झाला शेवटचा भाग

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

SCROLL FOR NEXT