घोडेगाव, ता. १८ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दरेकरवाडी सेवा केंद्राच्या वतीने जीवनदान महाकुंभ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा दिवस चालणाऱ्या जीवनदान महाकुंभ आठ ते अठरा जानेवारी २०२६ मध्ये रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने दरवर्षी लाखो रक्तकुपिका सरकारी दवाखान्यांना विनामूल्य दिल्या जातात.
घोडेगाव येथील शिबिराप्रसंगी रामानंदाचार्य नरेंद्रचार्य संस्थांचे आंबेगाव तालुकाध्यक्ष विजय मुंडे, तालुका महिला अध्यक्ष शारदा थोरात, अमित शिंदे, ज्ञानेश्वर गोरे, मनोज शिंदे, विजय शिंदे, खंडू घोडेकर, सविता घोडेकर, रेश्मा दरेकर, माधुरी दरेकर, अल्पना दरेकर आदी उपस्थित होते.