घोडेगाव, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने आंबेगाव तालुक्यात शोककळा पसरली. मंचर शहरासह अवसरी खुर्द, पिंपळगाव, आदर्शगाव गावडेवाडी, लांडेवाडी, घोडेगाव, शेवाळवाडी, सातगाव पठार परिसरातील गावांमध्ये स्वयंस्फूर्तीने व्यवहार बंद ठेवले होते.
आवडत्या नेत्याच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिकही हळहळ व्यक्त करताना दिसून आले.
सकाळी अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच तालुक्यातील वातावरण क्षणात बदलले. सुरुवातीला अनेकांना या बातमीवर विश्वास बसला नाही; मात्र वस्तुस्थिती स्पष्ट होताच शोकभावना अधिक तीव्र झाल्या. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनी दुःख व्यक्त केले.
मंचर शहरात अजित पवार यांचा फोटो आणि ‘केवळ निःशब्द’ असा संदेश असलेले फलक लावले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. शहरात शुकशुकाट जाणवत होता. तालुक्यातील इतर गावांमध्येही हेच चित्र दिसून आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला प्रचार सर्व पक्षांच्या उमेदवारांनी थांबवला. अनेक ठिकाणी नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले.
मंचर शहरात नगरपंचायतीच्या वतीने लावण्यात आलेल्या स्क्रीनवर अजित पवार यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात येत होती. गावोगावी फलक लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.