घोडेगाव, ता. ८ : आंबेगाव तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गणांसाठी ६५.३० टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली. दरम्यान, तालुक्यात कोण ठरणार वरचढ याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद गटांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना व भाजप यांच्यात काटे की टक्कर की लढाई होत आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जोरदार टक्कर देताना दिसत आहे. एकूण मतदान १ लाख ८४ हजार ५२ असून १ लाख २० हजार १८२ (६५.३० टक्के) मतदारांनी हक्क बजावला आहे. सर्वात जास्त मतदान पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक -जारकरवाडी गटात ७३.११ टक्के झाले. येथे माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व अरुण गिरे यांच्यात जोरदार लढत आहे. पंचायत समिती गणामध्ये पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे सर्वात जास्त ७४.६५ टक्के मतदान झाले. आदिवासी भागातील बोरघर-शिनोली गटात सर्वात कमी ५४.२४ टक्के मतदान झाले. तालुक्यात अनेक ठिकाणी क्रॉस वोटींगची चर्चा असल्यामुळे कोण उमेदवार जिंकून येईल याबाबत संभ्रमावस्था आहे.
गटनिहाय मतदान
गट***एकूण मतदार***झालेले मतदान***टक्केवारी
बोरघर-शिनोली***३६८४६***१९९८४***५४.२५
घोडेगाव-पेठ***३७४२८***२३७६१***६३.४८
कळंब-चांडोली***३८४९१***२७२२७***७०.७४
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक***जारकरवाडी***३५७४६***२६१३३***७३,११
पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे***अवसरी बुद्रुक*** ३५५४१***२३०७७***६४.९३
गणनिहाय मतदान
गण*** एकूण मतदार***झालेले मतदान***टक्केवारी
बोरघर***१७५४१***९६३२***५४.९१
शिनोली***१९३०५***१०३५२***५३.६२
घोडेगाव***२१६१३***१३६८३***६३.३१
पेठ***१५८१५***१००७८***६३.७२
कळंब***१८८६०***१३१०२***६९.४७
चांडोली बुद्रुक ***१९६३१***१४१२५***७१.९५
पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक ***१६२२७***१२१०८***७४.६५
जारकरवाडी***१९५१९***१४०२५***७१.८५
पिंपळगाव तर्फे महाळुंगे ***१७५८८***११४४९***६५.१०
अवसरी बुद्रुक***१७९५३***११६२८***६४.७७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.