पुणे

घोडेगाव येथे विद्यार्थ्यांकडून पारंपरिक वेशभूषा

CD

घोडेगाव, ता. २३ ः घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. यावेळी शिवरायांच्या अतुलनीय कार्याची गाथा सांगणारे कार्यक्रम सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे पारंपरिक पेहराव परिधान करून कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, उपाध्यक्ष संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष सुरेश काळे, संस्थेचे संयुक्त सचिव प्रशांत काळे, विद्यालयाचे अध्यक्ष बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक सोमनाथ काळे, विद्यालयाच्या प्राचार्या मेरी फ्लोरा डिसोजा, उप प्राचार्या रेखा आवारी, पर्यवेक्षिका वंदना वायकर, पालक शिक्षक संघाच्या सदस्य यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी पोवाडा, शिवस्तुती गीते सादर करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्री प्रायमरी विभागाच्या मुलांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक समीर मुजावर यांनी सुंदर देखावा साकारला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ९वीच्या विद्यार्थिनी आयूशी पडवळ व स्वर्णिमा डोंगरे यांनी केले. प्रास्ताविक प्रज्ञा घोडेकर यांनी केले.

04751

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT