घोडेगाव, ता. २७ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव( ता. आंबेगाव) यांच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई व जनजाती सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य ॲड किरण गभाले यांच्या हस्ते करण्यात आले. वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारात प्रकल्प कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अधिकारी व कर्मचारी, वसतिगृह प्रमुख व कर्मचारी, सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्त चंचल पाटील व प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आदींच्या उपस्थितीत झाला.
सांघिक खेळात कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, हँडबॉल हे प्रकार व वैयक्तिक खेळात १००, २००, ४००, ६०० मीटर धावणे, गोळाफेक, भालाफेक, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन आदी खेळ घेण्यात आले.
क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सलग चार षटकार सतीश गर्जे व सलग तीन फलंदाज सुजाता गायकवाड यांनी बाद केले.
सांघिक विजेत्या संघांची नावे पुढीलप्रमाणे ः कबड्डी (पुरुष) - विजेता - बामणोली केंद्र, उपविजेता- अंजनावळे केंद्र, कबड्डी (महिला) - विजेता- आंबेगाव केंद्र, उपविजेता - वडेश्वर केंद्र.
व्हॉलीबॉल (पुरुष) - विजेता बामणोली केंद्र, उपविजेता - अंजनावळे केंद्र, व्हॉलीबॉल (महिला) - विजेता अंजनावळे केंद्र,
उपविजेता - बामणोली केंद्र.
क्रिकेट (पुरुष) - विजेता अंजनावळे संघ, उपविजेता - प्रकल्प कार्यालय घोडेगाव संघ, क्रिकेट (महिला) - विजेता प्रकल्प कार्यालय घोडेगाव संघ, उपविजेता - अंजनावळे संघ.
हँड बॉल (महिला) विजेता प्रकल्प कार्यालय घोडेगाव केंद्र, उपविजेता - आंबेगाव केंद्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.