घोडेगाव, ता. ९ : तांबे (ता. जुन्नर) येथे दोन दिवसीय ‘शाश्वत उपजीविका व उद्योजकता विकास’ प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच पार पडला. आदिवासी महिलांचे आर्थिक परावलंबित्व कमी करून त्यांना ‘कृषी-उद्योजक‘ बनवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणात ७० महिलांनी सहभाग नोंदवला.
पेसा ग्रामकोष समिती- ग्रामपंचायत तांबे, आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र-आंबेगाव आणि विज्ञान आश्रम - पाबळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
तांबे गाव नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.महिलांना २८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आदिम संस्थेचे सचिव डॉ. अमोल वाघमारे, व्यवस्थापक प्रा. स्नेहल साबळे,
सरपंच मीराबाई मडके, उपसरपंच चंद्रकांत पारधी, सदस्य संतोष डावखर, विकास मडके, सुरेखा जोशी, ग्रामपंचायत अधिकारी नितीन भवारी, सुशील मडके, प्रफ्फुल जोशी, सखाराम लोहकरे उपस्थित होते.
विश्वनाथ निगळे, समीर गारे, पाबळमधील विज्ञान आश्रमाचे गणेश पिंगळे आदींनी महिलांना मागर्दशन केले. ०दरम्यान, महिलांना ‘हातसडीचा तांदूळ’ तयार करणे, पॅकेजिंग आणि ग्रेडिंग याविषयी देखील माहिती दिली.
पेसा ग्रामकोष समितीचे किरण लोहकरे, लीला जोशी व पेसा मोबीलायझर आश्विनी मडके यांनी हा कार्यक्रम यशस्वी यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.