घोडेगाव, ता. १८ : कोलदरे (ता आंबेगाव) येथील रहिवासी सोमनाथ खंडू काळे (वय ४७) यांचा भीमाशंकर महामार्गावरील घोडेगावजवळील बेल्हवरेवस्ती परिसरात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ते घरी परतत असताना एका भरधाव मोटारीने त्यांना धडक दिल्याचे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांकडून ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काळे यांना तत्काळ घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार करीत आहेत.