घोडेगाव, ता. २५ : आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील हरिचंद्र मंदिराजवळ बाळू शिवराम वाजे (रा. आंबेदरा) यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी रवींद्र रोहिदास सरजिने (रा. जुन्नर) याला अटक करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी दिली. प्राथमिक तपासात घटनास्थळी गुन्ह्यात वापरलेले हत्यार व इतर पुरावे जप्त करून आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करून येरवडा कारागृह पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश पवार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.