पुणे

शिंदेवाडीतील अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

CD

घोडेगाव, ता. १८ : मंचर-भीमाशंकर रस्त्यावरील शिंदेवाडीजवळ कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक किशोर रामचंद्र नवले (वय ५४, रा. पिंपळगाव घोडे) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी कारचालक शंकर गेनू शेलार याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी घोडेगावकडून भीमाशंकरकडे जाणाऱ्या कारने (MH १४ JX ५००२) समोरून येणाऱ्या रिक्षाला (MH १७ AJ १२८२) जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. यानंतर कारने एका इर्टिगा गाडीलाही (MH १४ JR १८७३) धडक दिली. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. किशोर बबन पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी चालक शंकर शेलार (रा. भोसरी) याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास घोडेगाव पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : भीषण अपघात! भरधाव येणाऱ्या मॅजिक व्हॅनची ट्रकला धडक, नऊ जणांचा जागीच मृत्यू

सायली-प्रिया दोघीही आई होणार! ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले...

Ghodegaon Accident: घोडेगाव–भीमाशंकर रस्त्यावर भीषण अपघात; समोरासमोर धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू, घोडेगाव परिसरात हळहळ..

Riyan Parag:'... तर आम्ही प्लेऑफमध्ये पोहचणार नाही', दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला रियान पराग?

राज्यातील पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी, विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक जाहीर, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT