पुणे

गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल लंपास

CD

गुळुंचे, ता. १६ : पुरंदर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा शिवतक्रार येथील आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीचा फायदा घेऊन बाजारहाट घेताना मोबाईल लांबवले जात असून स्थानिक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.
येथील प्रभाग दोन मध्ये बाजारतळ आहे. विक्रेत्यांना माल विकण्यासाठी सिमेंटचे चबुतरे केले आहेत. पंचक्रोशीतील ही मोठी बाजारपेठ असल्याने गुळुंचे, राख, कर्नलवाडी, नीरा, शिवतक्रार, पिंपरे, पाडेगाव तसेच अनेक वाड्यावस्त्यांवरून लोक बाजार घेण्यासाठी येतात. बुधवारी येथील आठवडी बाजार भरतो. दरम्यान, वाढत्या गर्दीला बाजारतळ अपुरा पडत आहे. त्यामुळे विक्रेते शाळा, मार्केटयार्डकडे जाणारा रस्ता, पंढरपूर पुणे मार्गावरून आत प्रभाग तीनमध्ये येणाऱ्या रस्त्यावर तसेच पुणे पंढरपूर महामार्गाच्या कडेला आपली दुकाने थाटत आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर वाहतूक विस्कळित होऊन गर्दी वाढत आहे. बाजारात देखील दाटीवाटीने दुकाने असल्याने वाढती गर्दी पाहायला मिळत आहे.

नेमक्या याच गर्दीचा फायदा घेत चोर खिशातील मोबाईल लांबवत आहेत. विशेषतः संध्याकाळी बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा चोरटे घेत आहेत. गुळुंचे येथील यात्रा कमिटीचे पंच पोपट निगडे यांच्यासह आजवर अनेकांच्या मोबाईलवर चोरांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे वेळीच या चोरांच्या मुसक्या आवळल्या जाणे गरजेचे आहे. पोलिसांकडून मात्र माहिती मिळूनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


बाजार करत असताना कुणी मोबाईल चोरला तेच समजले नाही. गर्दी प्रचंड होती त्यात अंधार होता. काही वेळानंतर मोबाईल चोरीला गेल्याचे समजले पण तोवर बराच उशीर झाला होता. अशा चोरांना वेळीच पोलिसांनी धडा शिकवावा.
- पोपट निगडे, ग्रामस्थ, गुळुंचे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT