पुणे

माउलींच्या स्वागताला नीरा नगरी सज्ज

CD

गुळुंचे, ता. ५ : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शनिवारी (ता. ६) पुरंदर तालुक्यातील नीरा येथून पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आटोपून सातारा जिल्ह्यात मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय व्यवस्था अलर्ट असून स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे माउलींच्या स्वागतासाठी नीरा नगरी सज्ज झाली असून माउलींच्या नीरा स्नानाच्या प्रतीक्षेत भाविक आहेत.
ग्रामपंचायतीच्या वतीने खड्डे, चिखल असलेल्या भागात मुरुमीकरण करण्याऐवजी वेस्ट खडी, सिमेंटसदृश कोरडे मिश्रण रस्त्यांच्या कडेने टाकण्यात आले आहे. यावर बारीक खडी टाकण्याची गरज असताना ती टाकली नाही. त्यामुळे अशा रस्त्यांवरुन वाट काढणे अवघड होणार आहे.
रस्त्याच्या कडेने असलेले धोकादायक, बेकायदा होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहे. येथील ब्रिटिशकालीन पुलावरून माउलींच्या पालखीचा सोहळा मार्गस्थ होतो. दरम्यान, गतवर्षी या पुलावरून पावसाचे पाणी गेल्याने पुलाची दुरवस्था झाली होती. या पुलावर डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या पुलाच्या सुस्थितीबाबत स्ट्रक्चरल ऑडिटची आवश्यकता असल्याचे मत स्थानिक भाविकांनी व्यक्त केले.
नीरा स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर नीरा नदीपात्रातील स्नानाच्या पायऱ्यांजवळील कचरा दूर करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने जलसाठ्यांचे शुद्धीकरण केले आहे. पोलिस प्रशासन येथील मुख्य शिवाजी चौकात तसेच पुलाच्या तोंडावर खडा पहारा देत असून अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनांची तपासणी सुरू असून गस्त वाढविण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून सर्वतोपरी भाविकांना सहकार्य होईल आणि सुखसोई मिळतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- तेजश्री काकडे, सरपंच, नीरा-शिवतक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT