गुळुंचे, ता. १८ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) येथे बाल आनंदी बाजार व महिला मेळाव्याचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाला चालना मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
या उपक्रमात विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी आयोजित बालआनंदी बाजारात पहिली ते सातवीमधील विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, थंड पेय, उन्हाळी पदार्थ इत्यादी पदार्थांचे स्टॉल लावून बाजार भरविला होता. यावेळी पिंपरे खुर्द व परिसरातील ग्रामस्थ तसेच, पालकांनी विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी करत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
दरम्यान, नुकताच झालेल्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शाळा व्यवस्थापन समिती व शालेय प्रशासनाच्यावतीने सन्मान करण्यात आला.
तसेच विविध मनोरंजनात्मक खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विजेत्या महिला पालकांचा व पाककृती स्पर्धा विजेत्या, सहभागी महिलांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक महादेव माळवदकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिदास थोपटे, उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक शिरीष प्रभुणे यांनी केले. बाळू मोरे यांनी सूत्रसंचालन, तर भाऊसाहेब बरकडे यांनी आभार मानले.
सन्मानित करण्यात आलेल्या महिला
ग्रामसेविका योजना शंकर चव्हाण, उपसरपंच नंदा संजय थोपटे, तलाठी पल्लवी सुदान नरळे, पोलिस पाटील रूपाली निवास सोनवणे, आशा सेविका स्वाती राहुल थोपटे, आदर्श माता पालक चतुराबाई बाबासाहेब थोपटे, अंगणवाडी सेविका सीमा रामदास मोरे, वैजयंता पोपट गायकवाड, आरोग्य अधिकारी मृणाली लक्ष्मण सोनवणे, महाराष्ट्र पोलिस योगिता देविदास थोपटे, कृषी पर्यवेक्षक माधुरी प्रवीण गायकवाड,
आदर्श माता कविता सुरेश थोपटे, कल्पना भगीरथ निगडे, वर्षा भानुदास पवार, धनश्री जीवन निंबाळकर व सहशिक्षिका रूपाली धनंजय गायकवाड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.