पुणे

पालखी मार्गावर लक्ष्मण हाकेंनी मांडले ठाण

CD

गुळुंचे, ता. ३१ : नीरा (ता. पुरंदर) येथे रविवारी (ता. ३१) सायंकाळी मराठा आंदोलक तरुण व ओबीसी नेते लक्ष्मण हाके व समर्थक यांच्यात सौम्य बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील वादाचा प्रसंग टळला. मात्र, लक्ष्मण हाके यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर ठाण मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके कामानिमित्त लोणंदच्या दिशेने जात असताना नाश्ता करण्यासाठी नीरा येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथेच असलेले काही मराठा तरुणांनी आरक्षणाबाबत हाके यांना छेडले. त्यावर प्रत्युत्तर देताना हाके व तरुणांच्यात बाचाबाची झाली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’, ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा यावेळी तरुणांनी दिल्या. यावेळी हाके यांच्यासोबत असलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनोज जरांगे मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. तर हाके यांनी मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेतली आहे. एकीकडे सरकारी पातळीवरून आंदोलनकर्त्यांना ठोस आश्वासन दिले जात नसल्याने तणावाचे वातावरण आहे. अशात हाके यांच्या आरक्षणविरोधी भूमिकेबाबत मराठा तरुणांनी त्यांना जाब विचारला त्याचे पर्यवसान बाचाबाची झाले. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. दरम्यान, सचिन मोरे, अजित सोनवणे, मंगेश ढमाळ या तरुणांनी हाकेंवर हल्ला झाल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.

हल्ला झालाच नाही
एका वृत्तवाहिनीशी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. मात्र, याबाबत जेजुरी पोलिस ठाण्याचे फौजदार सर्जेराव पुजारी म्हणाले की, ‘‘आरक्षणासंदर्भात घोषणाबाजी झाली. कोणत्याही स्वरूपाचा हल्ला झालेला नसून याविषयावर आमच्याकडे निवेदने येत आहेत. नीरा पोलिसांनी आपले कर्तव्य केले आहे.’’

‘‘आम्ही गरीब मराठे असून आम्हाला आरक्षणाची गरज आहे असे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर आम्हीही घोषणा दिल्या. हल्ला वगैरे काही झाला नसून गैरसमज पसरवला जात आहे.’’
-मंगेश ढमाळ, मराठा तरुण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT