पुणे

तीस गुंठ्यात फुलविली सजावटीच्या सूर्यफुलांची शेती

CD

सासवड शहर, ता. ३१ : सासवड (ता. पुरंदर) येथील शेतकरी विलास गंगाधर जगताप यांनी सजावटीसाठी लागणाऱ्या सूर्यफुलाचे उत्पादन घेतले व नवरात्र व दसऱ्याला त्याची विक्री करून सुमारे एक लाख ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. ''विकेल ते पिकेल'' उक्तीनुसार जगताप यांनी योग्य नियोजन करून भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. लग्न समारंभ, वाढदिवस तसेच विविध मंदिरांच्या सजावटीसाठी आवर्जून वापर केला जात असल्याने सूर्यफुलांच्या फुलांना सध्या मोठी मागणी वाढली आहे.

जगताप यांनी प्रथम नांगरट केल्यानंतर फणपाळी केली. त्यानंतर चार फुटांवर ठिबक सिंचनाचे पाइप टाकले. सकाटा विन्सेंट - २ या वाणाचे सुमारे एक बाय एक फुटावर टोकन केले. त्या अगोदर १०/२६/२६ एकरी दोन बँग व सुष्म व दुय्यम अन्नद्रव्ये १० किलो प्रत्येक एकरी वापरली. ६ ते ७ दिवसांनी उगवण झाली. पिकावर मावा, तुडतुडे होऊ नये म्हणून औषध फवारणी केली. उगवण झाल्यानंतर दोन दिवसांनी १० लिटर व ४५ दिवसांनी २० लिटर पाणी ठिबकद्वारे दररोज दिले. यामुळे जोमदार पीक बहरले.
दरम्यान, विलास जगताप यांना पॅकिंगच्या कामात मुलगा शुभम जगताप, पत्नी रेखा जगताप, शंकर जवळकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

लग्न समारंभ, वाढदिवस, सभा अशा कार्यक्रमासाठी या सूर्यफुलांचा वापर होतो. ते कळीत असताना कापले जाते. फ्लॉवर पॉटमध्ये ठेवले तर ते १४ ते १५ दिवस ताजे राहते. फूल कळीत कापले जाते फ्लावर पाँटमध्ये ठेवले तर हे फूल १४ ते १५ दिवस राहते. तर बाहेरील मोकळ्या हवेत ३ ते ४ दिवस राहते. अशा प्रकारे ३० गुंठ्यांत अडीच महिन्यात सूर्यफूल शेतीत एक लाख ७० हजार रुपये उत्पन्न मिळते.
- विलास जगताप, शेतकरी

गड्डीला यंदा१०० रुपये बाजारभाव
सूर्यफुलाच्या गड्डीला यंदा ८० रुपये ते १०० रुपये बाजारभाव मिळाला. सुमारे पाच फुलांची गड्डी असते. या पाच फुलांच्या गड्डीचे पॅकिंग करावे लागते. सजावटीच्या फुलात हल्ली सूर्य फुलांचा नंबर लागतो. पँकिंग केलेली फुले पुण्याच्या बाजार पेठेत पाठवली जातात.

07737

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT