पुणे

डॉ. बर्वे, माईणकर, शिंदे यांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्कार जाहीर

CD

सासवड शहर, ता. २ : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘आचार्य अत्रे पुरस्कारां’ची घोषणा नुकतीच करण्यात आली. यावर्षीचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार’ मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखिका डॉ. संगीता बर्वे यांना, ‘आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर यांना तर ‘आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार’ ज्येष्ठ दिग्दर्शक व शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कारांचे यंदाचे ३४वे वर्ष आहे.

पुरस्कार वितरण सोहळा १३ जून रोजी सासवडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दुपारी चार वाजता संपन्न होणार असून आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. बाबूराव कानडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भारती सहकारी बँकेचे चेअरमन सी. ए. भाऊसाहेब कड उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. यावेळी मसाप सासवड शाखेचे अध्यक्ष प्रकाश खाडे, प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण, बंडूकाका जगताप, ॲड. दिलीप निरगुडे, वसंतराव ताकवले, डॉ. राजेश दळवी, कुंडलिक मेमाणे, शिवाजी घोगरे, गौरव कोलते, डॉ. अरुण कोळेकर, राजेंद्र चांदगुडे, जालिंदर जगताप, सुनील जगताप, उत्तम धुमाळ, अनिल क्षिरसागर, डॉ. राजेश दळवी, दादा मुळीक, शहाजी पवार व पदाधिकारी उपस्थित होते. आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान दरवर्षी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १३ जून या स्मृतिदिनी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत असते.

फोटो :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT