पुणे

पुरंदरमध्ये भात रोपवाटिकेसाठी मशागतीची लगबग

CD

गराडे, ता.१० : पुरंदर तालुक्यात इंद्रायणी या वाणाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तालुक्याच्या पश्चिम भागात साधारण गराडे, कोडीत, सोमुर्डी, भिवडी, भिवरी, केतकावळे, देवडी, पोखर, कुंभोशी, सुपे, थापे-वारवडी, नारायणपूर, या भागात साधारण ८० टक्के इंद्रायणी वाणाची लागवड केली जाते. ही लागवड १२०८ हेक्टरवर केली जाते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी दिली.
पुरंदर तालुक्यात मॉन्सूनचे ने जोरदार हजेरीने लावल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सध्या शेतात वापसा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता भात पिकाच्या रोपवाटिका तयार करण्यासाठी शेताची मशागत करण्यात शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

रोपवाटिका तयार करण्यासाठी अंतर मशागतीच्या वेळी बैलाच्या साह्याने कोळपणी करावी लागते. त्यानंतर शेतात भाताचे बियाणे टाकून पुन्हा कोळपणी केल्यानंतर साधारण पाच सहा दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे तयार झाल्यानंतर एक महिन्याने लागवडीसाठी रोपे लागवडीसाठी तयार होतात. यावर्षी २० टक्के बियाणे दरात वाढ झाली असल्याने शेतकरी नाराज असल्याची माहिती पुरंदर तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक शांताराम भोराडे यांनी दिली.

तयार झालेली रोपे जुलै मध्ये लागवडीसाठी वापरली जातात. इंद्रायणीचे एकरी ३० पोती उत्पादन होते. अशी माहिती काळदरीचे आदर्श सरपंच अंकुश परखंडे व ज्ञानेश्वर बाठे यांनी दिली.

पुरंदर तालुक्यात मॉन्सून पेरणी योग्य झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवड करताना त्रिसुत्रीचा वापर करावा. यामुळे उत्पादन अधिक मिळेल.
- शेखर कांबळे, मंडल कृषी अधिकारी

08855

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT