पुणे

सासवड नगरपालिका कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी जगताप

CD

सासवड शहर, ता. ३० : सासवड नगरपालिका कामगार को ऑप.. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी सविता सुनील जगताप तर उपाध्यक्ष म्हणून आशा मिलिंद रणपिसे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सभेत निवडणूक निर्णय अधिकारी ए. एस. बागवान यांनी ही बिनविरोध निवड जाहीर केली आहे. मावळते अध्यक्ष विकास राठोड यांचा कार्यकाल संपल्यामुळे या निवडी जाहीर केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सोसायटीच्या ७७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.
१९४७ मध्ये स्थापन केलेल्या या संस्थेचे १ कोटी ६४ लाख भागभांडवल असून सध्या ६० सभासद आहेत. पंधरा संचालक मंडळ असणाऱ्या संस्थेने चालू आर्थिक वर्षात दहा टक्के लाभांशासह भेटवस्तूही दिली आहे. नवनियुक्त अध्यक्ष सविता जगताप यांनी मागील पंचवार्षिक काळात उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या निवडीबद्दल मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, माजी अध्यक्ष मोहन चव्हाण यांसह सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT