पुणे

सासवडमध्ये उमाजी नाईक यांचा पुतळा उभारणार : जगताप

CD

गराडे, ता. १५ : ‘‘आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची पुरंदर जन्मभूमी असल्याने त्यांच्या कार्याला साजेसे असे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा सासवड शहरात उभारण्यात येईल.’’ असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
पुरंदर तालुक्यातील दिवे येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. त्या प्रसंगी जगताप बोलत होते. यावेळी उमाजी नाईक यांचे सातवे वंशज चंद्रकांत खोमणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जय मल्हार क्रांती संघटना राज्य अध्यक्ष दौलत शितोळे व भाजप नेते बाबाराजे जाधवराव प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने नुकताच राज्यातील सर्व आयटीआय केंद्राचे नामांतर करण्याचा अध्यादेश काढला असून त्या अनुषंगाने हे नामांतर केले आहे. भिवडी येथील राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी देखील पावले उचलली जातील असे आश्‍वासन संजय जगताप यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्राचार्य राजेश धानोरकर यांनी प्रास्ताविक केले आणि उपस्थितांचे स्वागत केले. बाबाराजे जाधवराव यांनी या वेळी संस्थेचा परिसर आनंददायी वाटला पाहिजे तसेच कोर्स संख्या वाढवावी असे आवाहन केले. संघटनेचे नेते दौलत शितोळे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले व सासवड येथे उमाजी नाईक यांचे भव्य स्मारक व्हावे तसेच भिवडी येथे स्मारकासाठी अधिक जागा संपादन करून भव्य राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर समाज बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बहिर्जी नाईक यांच्या बाबत सरकार उदासीन असल्याची खंत देखील शितोळे यांनी भाषणात व्यक्त केली.
कार्यक्रमास काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, सरपंच योगेश काळे, भिवडीच्या सरपंच श्‍वेता चव्हाण, माजी सरपंच गुलाब झेंडे, साहेबराव जाधव, बिट्टूशेठ भांडवलकर, लालासाहेब भांडवलकर, गणपत शितकल, गंगाराम जाधव, चेतन महाजन, हनुमंत भांडवलकर, विलास कडलग, अप्पासाहेब भांडवलकर, मनोहर ताथवडकर उपस्थित होते. प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar court Firing: पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; कोयत्याने हल्ला, एकाचे दोन्ही हात छाटले

Jan Kalyan Expressway: जनकल्याण एक्सप्रेस-वे बीडऐवजी भूम-वाशीतून न्या; धाराशिवकरांची मागणी, खासदार ओमराजे निंबाळकरांचा पाठपुरावा

Fake IAS Officer : बारावी पास तोतयाचा कारनामा ! १४ वर्षे आयएएस अधिकारी म्हणून फिरला; अनेकांना घातला कोट्यवधींचा गंडा, अखेर 'असा' झाला पर्दाफाश

Taj Mahal Protection: ताजमहालच्या संरक्षणासाठी उभारले जातेय हिरवेगार सुरक्षा कवच, धूळ व प्रदूषणावर मिळणार नियंत्रण

Sheikh Hasina: 16 डिसेंबरपर्यंत बांगलादेश ताब्यात घेऊ! हिंदूंवरील अत्याचाराचा बदला घेण्याचा भाजप मंत्र्याचा दावा

SCROLL FOR NEXT