सासवड शहर, ता. ३ : थापेवाडी (ता. पुरंदर) येथे शेतमजूर अभंग हरिभाऊ कांबळे (वय ३३, मूळ रा. ब्रम्हांण्डपुरी, सध्या रा. थापेवाडी) यांनी मंगळवारी (ता.७) आत्महत्या केली. याबाबत बाळासाहेब काळूराम खवले (वय ५८ थापेवाडी, ता. पुरंदर) यांनी आत्महत्या केल्यासंदर्भात सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी खवले यांनी अभंग कांबळे यास आज सकाळी उठविण्यासाठी त्याच्या घराचे दार वाजवले. मात्र, कांबळे याने काहीच प्रतिसाद आला नाही. म्हणून खवले यांनी खिडकीतून पाहिले तेव्हा त्यांना घराच्या पत्र्याच्या अँगलला साडीने गळफास घेतलेला दिसला. दरम्यान, पुढील तपास सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.