सासवड शहर, ता. ११ : पुरंदर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली असून, यात ४८ ठिकाणी महिला सरपंचपदासाठी आरक्षण पडल्यामुळे तालुक्यात महिलाराजला संधी असल्याचे चित्र आहे. यात अनुसूचित जाती स्त्री ४, अनुसूचित जमाती स्त्री २, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री १३, सर्वसाधारण स्त्री २९, अशा ४८ जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृहात ११ जुलै रोजी दुपारी ९३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत तहसीलदार विक्रम राजपूत यांनी जाहीर केले. यावेळी नायब तहसीलदार संदीप पाटील, गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ हे उपस्थितीत होते.
सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे :
अनुसूचित जाती स्त्री- केतकावळे, हरगुडे, तोंडल, मावडी सुपे.
अनुसूचित जाती- कुंभारवळण, कोडीत बुद्रुक, वनपुरी.
अनुसूचित जमाती स्त्री- चिव्हेवाडी, घेरा पुरंदर.
अनुसूचित जमाती- काळदरी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- कोडीत खुर्द, सोनोरी, खेंगरेवाडी, पुर-पोखर, नाझरे सुपे, बेलसर, वाल्हे, आंबोडी, खळद, भिवरी, पांडेश्वर, देवडी, वागदरवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग- पोंढे, पिंपरे खुर्द, खानवडी, शिवरी, भिवडी, राख, जेऊर, वीर, पिंपळे, गुऱ्होळी, साकुर्डे, बोपगाव.
सर्वसाधारण स्त्री- दिवे, नीरा, रिसे, पिंगोरी, पांगारे, धालेवाडी, सुपे खुर्द, पिसर्वे, पानवडी, नावळी, गराडे, कोळविहिरे, नायगाव, जवळार्जुन, वाळुंज, पिंपरी, झेंडेवाडी, हरणी, चांबळी, माहूर, सुकलवाडी, बो-हाळवाडी, निळुंज, राजेवाडी, लपतळवाडी, तक्रारवाडी, सटलवाडी, पिसे, दवणेवाडी.
सर्वसाधारण- एखतपूर, गुळुंचे, कोथळे, वाघापूर, आंबळे, धनकवडी, मावडी कप, हिवरे, दौंडज, परिंचे, माळशिरस, टेकवडी, राजुरी, सोमुर्डी, बहिरवाडी, पिसुर्टी, पारगाव, रानमळा, सिंगापूर, मांडकी, नाझरे कप, कर्नलवाडी, उदाचीवाडी, मांढर, थापेवारवाडी, आस्करवाडी, आडाचीवाडी, भोसलेवाडी, नवलेवाडी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.