पुणे

पुरंदरमधील गुणवंतांचा इतिहास तरुणांना प्रेरणादायी

CD

सासवड शहर, ता. ९ : ‘‘पुरंदरला आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक, शैक्षणिक असा वारसा आहे. या सानिध्यात वाढलेले अनेक लोक आपल्या कर्तृत्वाने मोठे झाले आहेत. अशा या थोर मोठ्या लोकांचा शोध घेऊन त्यांना पुरंदरचे गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम नुकताच सुरू झाला आहे. यानिमित्ताने तालुक्यातील गुणवंतांचा इतिहास तरुणांच्या पुढे आल्यास त्यांना तो प्रेरणादायी ठरेल,’’ प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखेचे माजी अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (ता. ८) जालिंदर कामठे मित्र परिवाराच्या वतीने पुरंदरचे गुणवंत म्हणून माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गुलाबराव भोईटे व माळशिरस गावचे माजी सरपंच व गुलटेकडीचे व्यापारी एकनाथ बाजीराव यादव यांना गुणवंत पुरस्काराने समाजवादाचे ज्येष्ठ अभ्यासक रावसाहेब पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पुरस्कारात स्मृतीचिन्ह, विठ्ठल रखुमाई मूर्ती, शाल, श्रीफळ यांचा समावेश होता.
यावेळी नीरा मार्केट कमिटीचे माजी संचालक भानुदास जगताप, मार्केट कमिटीच्या संचलिका शहाजान रफिक शेख, रफिक शेख, लक्ष्मण महाराज यादव, दत्ता भोईटे, सोनाली यादव, संदीप देवकर, एकनाथकाका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, सचिन पठारे, महेश जगताप, नवनाथ बोरावके, दत्ता राऊत, शिवाजी साळुंखे, रामभाऊ झेंडे, मनोहर जगताप, राजेंद्र कोलते, कुंडलिक मेमाणे, ॲड. धनंजय भोईटे, माऊली यादव, शांताराम भोराडे आदी उपस्थित होते.
यावेळी जालिंदर कामठे यांनी सांगितले की, ‘‘प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पुरंदरचे गुणवंत या नावाने दोन व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. यात राजकारण बाजूला ठेवून समाजासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.’’
ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे काम केले तसेच कोथळे येथे शाळेची सुंदर इमारत बांधून लोकांच्या पुढे आदर्श उभा केला आहे. तसेच त्यांचे विविध क्षेत्रातील काम वाखाणण्यासारखे आहे, असे नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नंदकुमार जगताप यांनी प्रास्ताविकात सांगितले. संतोष जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर सचिन पठारे यांनी आभार मानले.

11594

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT