पुणे

‘संविधान घर निर्माण करून जागृती करा’

CD

सासवड शहर : आताच्या परिस्थितीत संविधान वाचवण्यासाठी पुरंदर तालुक्यातील सर्व गावांना संविधान घर निर्माण करून जागृतीचे काम सुरू करा ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सासवड साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथे सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे संविधान दिनानिमित्त संविधान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्‍घाटन अभिनेते, लेखक व दिग्दर्शक डॉ. मिलिंद शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ‘सिद्धार्थ पुरस्कार’ वितरण करण्यात आले. समाज, शिक्षण, पत्रकारिता आणि प्रशासन क्षेत्रातील कर्तृत्वाला गौरविणाऱ्या या परिषदेत संविधान मूल्यांच्या जपणुकीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. कार्यक्रमाच्या आधी महिलांच्या हस्ते मनुस्मृतीचे प्रतिकात्मक प्रतींचे दहन करण्यात आले. प्रथम सत्रात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी ‘संविधानातील मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि सामाजिक न्यायाची आवश्यकता’, सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲड. महेंद्र कवचाळे यांनी ‘न्यायव्यवस्थेची भूमिका आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण’ यावर प्रकाश टाकला. या सत्रास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद धिवार, सुनील लोणकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त! 20 दिवसांतील सर्वात कमी दर, 10 तोळ्यांमागे 36,500 रुपयांची घसरण; पाहा आजचा भाव

Miraj PSI Death : मिरजेतील पीएसआयने कॉल, मेसेजला उत्तर दिलं नाही; नंबर ट्रॅक लावला अन् घटनास्थळी पाहताच, एसपींसह सांगली पोलिसांना बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागातही गॅससाठी रांगा, मोवाड-नरखेडमध्ये नागरिकांची सकाळपासून गर्दी

Nashik: कुंभमेळ्याची तयारी सुरु असताना नाशिकला ‘पाण्याचा आशीर्वाद’? अंडरपास खोदकामात सापडली १२५ वर्षांपूर्वीची पाण्याने भरलेली विहीर

Kolhapur Money Fraud : नफ्याच्या आमिषाने २१ लाखांची  फसवणूक ; संशयित गडहिंग्लजचा, व्यापारी चंदगडचा

SCROLL FOR NEXT