सासवड शहर, ता. ३० : सासवड (ता. पुरंदर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सेठ गोविंद रघुनाथ साबळे औषध निर्माण महाविद्यालयात दीक्षारंभ विद्यार्थी परिचय कार्यक्रम आणि पालक मेळावा सोमवार (ता. २४) ते शनिवार (ता. २९) या कालावधीत झाला. यात विविध शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासक उपक्रम पार पडले.
यावेळी सासवड फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या रेणुका सिंह मर्चंट, प्राध्यापक डॉ. गणेश निगडे आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच योग गुरू डॉ. घनश्याम खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी योग सत्र आयोजित करण्यात आले. प्रा. सृष्टी जाधव यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. अंकिता जवळकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.