पुणे

सासवड येथे हिंदू-मुस्लीम एकतेचा नारा

CD

सासवड शहर, ता. ८ : अमर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाच्या जागेत नवीन मंदिराची निर्मिती केली जात आहे. या निमित्ताने सासवड येथे गणेश चतुर्थी निमित्ताने निधी संकलनाचे काम सुरू असून सासवडचे रहिवासी असणारे रशीद आतार यांनी आपले वडील पै. आसिफ आतार यांच्या स्मरणार्थ १ लाख १९ हजार ३१० रुपये निधी देऊन हिंदू-मुस्लीम एकतेचा नारा दिला.
या मंदिरासाठी मोरया डेव्हलपरचे नानासाहेब कुंभारकर (शिर्के) त्यांनी देखील निधी जमा केला. या मंदिरासाठी एक कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती अमर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संग्राम चव्हाण यांनी दिली. यावेळी सोळंकी ज्वेलर्सचे कपिल सोळंकी, सासवड भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, प्रशांत म्हेत्रे, प्रसाद पांडकर, प्रशांत गोलांडे, समीर चौधरी, सागर वारघडे, कैवल्य निरगुडे, कृष्णा झिरंगे, सौरभ चव्हाण, रोहित चौधरी, गणेश चौधरी, महेश जगताप, केदार बोत्रे आदी उपस्थित होते. दरम्यान, सासवड शहरात लहानाचे मोठे झालेले रशीद आतार यांचा गुलाल, बुक्का असे पूजेचे साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. ते सर्व सामान्य कुटुंबातील आहेत. तरी त्यांनी एवढा मोठा निधी श्री गणेशाच्या मंदिराला निधी दिला. याची चर्चा सासवड शहरात आहे. त्यांच्या या गणेश भक्तीने हिंदू-मुस्लीम एकतेचा नारा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सासवड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन शैलेश कुवाड यांनी तर माजी नगरसेवक संजय काटकर यांनी आभार मानले.

2217

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT