पुणे

घिसरेवाडी शाळेची ‘ग्लोबल’ वाटचाल

CD

दत्ता भोंगळे : सकाळ वृत्तसेवा

गराडे, ता. ३० : घिसरेवाडी (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने नावीन्यपूर्ण उपक्रम आणि आधुनिक शिक्षणपद्धतीच्या बळावर शिक्षण क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. लोकसहभाग, शिक्षकांचे परिश्रम आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे ही ग्रामीण शाळा आता खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र फाइल तयार करण्यात येऊन त्याची सर्वांगीण प्रगती नोंदवली जाते. शाळेच्या भिंतींवर शैक्षणिक संकल्पनांचे आकर्षक चित्रमय सादरीकरण केले आहे. सुसज्ज स्वयंपाकगृहातून स्वच्छ, पौष्टिक मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली जाते.

आधुनिक सुविधा
शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक, सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात शिक्षण दिले जाते. आकर्षक इमारत, रंगीत भिंती, सुंदर पेंटिंग्ज आणि स्वच्छ परिसर यामुळे ही शाळा सर्वांना हवीहवीशी वाटते. अत्याधुनिक डिजिटल पॅनेल बोर्डच्या साहाय्याने अध्यापन केले जाते. संगणक लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख दिली जाते. शाळा सौरऊर्जेवर चालत असून २४ तास वीज उपलब्ध असते. स्वच्छ पिण्यासाठी आरओ फिल्टर, हँडवॉश स्टेशन, २४ तास पाणीपुरवठा, सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शाळा अधिक सुरक्षित आणि सुसज्ज बनली आहे.

परकीय भाषा व भविष्योन्मुख उपक्रम
ग्रामीण भागात असतानाही या शाळेत विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचेही शिक्षण दिले जाते, हा विशेष उल्लेखनीय उपक्रम ठरला आहे. विद्यार्थ्यांची भाषा कौशल्ये वाढवण्यासाठी इंग्रजी शब्दसंपत्ती वृद्धी, स्पेलिंग स्पर्धा, कविता गायन स्पर्धा असे उपक्रम सातत्याने राबवले जातात. विद्यार्थी विषयमित्र, आनंदी शनिवार, पुस्तक वाचन अभिप्राय यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि वाचनाची आवड वाढते. विद्यार्थ्यांमार्फत शालेय व्यवस्थापन व वेगळ्या प्रकारचे प्रकल्प राबवून नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव विकसित केली जाते.

यशामागचे शिल्पकार शिक्षक
या यशामागे मुख्याध्यापक सचिन बोरावके आणि उपशिक्षिका प्राजक्ता संतोष धोंगडे यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाखा विनायक घिसरे व त्यांचे सहकारी तसेच सर्व पालक व विद्यार्थी यांचे शाळेच्या विकासात मोलाचे योगदान आहे.

पुरस्कार
- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तृतीय (२०२३-२४).
- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात द्वितीय (२०२४-२५).
- पुणे जिल्हा परिषदेकडून सचिन बोरावके यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (२०२५-२६).
- पुरंदर पंचायत समितीचा सचिन बोरावके यांना आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१८-१९).
- पंचायत समितीचा प्राजक्ता धोंगडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२४-२५).

भविष्यातील योजना
लवकरच कोडिंगचे मूलभूत शिक्षण, प्रयोगशील शिक्षण, ॲडव्हान्स रोबोटिक्स आणि शाळा रेडिओ स्टेशन सुरू करण्याची शाळेची महत्त्वाकांक्षी योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT