सासवड शहर, ता. ३० : पुरंदर तालुक्यातील हॉटेलमध्ये ३१ डिसेंबरनिमित्ताने असा मोठा झगमगाट असून, साधेपणाने सर्व ठिकाणी ३१ डिसेंबर साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने शहरातून लोक आनंद घेण्यासाठी बाहेर पडतात. कोठेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी मल्हारगड येथे व बोपदेव घाट येथे पोलीस खात्याच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.