पुणे

विजय कोलते ः सासवड येथे आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा ४०वा वर्धापन दिन साजरा

CD

सासवड शहर, ता. २ : ‘‘राज्यात कृषी- औद्योगिक व सहकाराची मोठी क्रांती झाली आहे. राजकारणापेक्षा सामाजिक काम जास्त करावे, अशी शिकवण महाराष्ट्राचे शिल्पकार कै. यशवंतराव चव्हाण यांनी दिली. त्यांचे शिष्य माजी मुख्यमंत्री शरदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे शैक्षणिक व सामाजिक काम ४० वर्षे सुरू आहे,’’ असे मत आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.
सासवड (ता. पुरंदर) येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचा ४० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी कोलते बोलत होते. या वर्धापन दिन कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली, तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये तालुका पातळीवर प्रथम आल्याबद्दल सचिन धनवट यांचाही सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने छापण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ॲड. दिलीप निरगुडे, ॲड. अण्णासाहेब खाडे, दिलीप गिरमे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीने विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त हेमंत भोंगळे, शशिकला कोलते, ॲड. कलाताई फडतरे, मंगला म्हेत्रे, सहसचिव गौरव कोलते, प्रा. संदीप टिळेकर, रमेश कोतवाल, स्कूल कमिटी अध्यक्ष श्रीहरी कोतवाल, रामचंद्र खेडेकर, ॲड. अशफाक बागवान, श्यामराव कोतवाल, बाळासाहेब मुळीक, शांताराम कोलते आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव शांताराम पोमण यांनी, तर सूत्रसंचालन सचिन घोलप यांनी केले. प्रतिष्ठानचे सहसचिव बंडूकाका जगताप यांनी आभार मानले.

12358, 12359

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचा साठा किती? इंडियन ऑइलने इंधन टंचाईच्या प्रश्नावर दिलं स्पष्टीकरण

Meta Anti-Scam Tool: WhatsApp-Facebook वर स्कॅमर्सची खैर नाही! मेटाचे नवे अ‍ॅण्टी-स्कॅम टूल्स लॉन्च, ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांना मोठा झटका

Circuit Bench Kolhapur : सर्कीट बेंचचे पोलिस अधीक्षक, बार असोसिएशनवर कडक शब्दात ताशेरे, महिला वकिल मारहाण प्रकरण

महाराष्ट्राचे खरे 'बिग बॉस' कोण आहेत? निवेदिता सराफ यांनी काय दिलं उत्तर? वाचून वाटेल कौतुक

US India Oil Deal: रशियन तेल खरेदी करू शकता, अमेरिकेनं भारताला दिली ३० दिवसांची सूट

SCROLL FOR NEXT