पुणे

कोडीत येथे ‘नाथ साहेबाचं चांगभलं’चा जयघोष

CD

गराडे, ता. १८ : श्रीक्षेत्र कोडीत (ता. पुरंदर) येथे पौष महिन्यातील अमावस्येनिमित्त व यात्रा जवळ आल्याच्या तयारीनिमित्त आज पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी देवांना महारुद्र अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर आरती करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरात समस्त ग्रामस्थ पोखर व कोडीत ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विविध फुलांची सजावट करण्यात आली होती.
दिवसभर अमावस्या असल्यामुळे भाविक-भक्तांनी कोडीत तेथील मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर भाविकांनी रांगा लावून दर्शनाचा लाभ घेतला.
सकाळी धूप आरती झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर नैवेद्य घेऊन पुन्हा मंदिर प्रदक्षिणा झाली. या वेळी गुलालाची उधळण करत नाथसाहेबांचं चांगभलं’चा जयघोष झाला. त्यानंतर मंदिरात छबिन्याचा कार्यक्रम होऊन समस्त ग्रामस्थ पोखर, दिवंगत निवृत्ती बडदे यांच्या स्मरणार्थ बाळासाहेब बडदे परिवार, शिवसाम्राज्य ग्रुप सासवड, दिलिप कामठे चांबळी, दिलीप कामथे खळद, मच्छिंद्र काळे काळेवाडी, अतुल शेंडकर चांबळी, प्रशांत जाधव चिंचवड, जालिंदर कामठे चांबळी, शशिकांत शेंडकर चांबळी, अनिल भोसले पिंगोरी, गणेश शेडकर चांबळी या मंडळींच्या वतीने दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. तर नाथ म्हस्कोबा व माता जोगेशवरी यांची यात्रा जवळ आल्याने कोडीतकरांनी यात्रेची जोरात तयारी चालवली असून नुकताच देवाचा साखरपुडाही संपन्न झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway helmet rule Kolhapur : कोल्हापूर महामार्गावर दुचाकीस्वारांना ‘नो हेल्मेट-नो एन्ट्री’, १६ मार्चपासून नियम लागू

'कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याची आजही लाज वाटते' श्रेया घोषाल हिचं वक्तव्य, म्हणाली...'तशी गाणी...'

India vs England: वानखेडेवर महासंग्राम! सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी भारत सज्ज; धोकादायक इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीची उत्कंठा शिगेला

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुक उमेदवारांनी केले अर्ज

Flight Ticket: वाढलेल्या तिकीट दरांमुळे विद्यार्थी त्रस्त; दुबईतील भारतीय दूतावासाने संपर्क न साधल्याने चिंतेत भर

SCROLL FOR NEXT