पुणे

यंदाची ‘महाराष्ट्र केसरी’ सासवडमध्ये

CD

सासवड शहर, ता. १९ : सासवड येथे प्रथमच ‘महाराष्ट्र केसरी’ या मातीतील कुस्ती स्पर्धा मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गौरव रोशनलाल (दिल्ली) यांनी बुधवारी (ता. १८) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संघाचे राज्याचे सचिव मोहन खोपडे, संघाचे राज्याचे अध्यक्ष नितीन बारणे, ऑलिंपिक पहिलवान आणि तांत्रिक अध्यक्ष ज्ञान सिंग, आयोजक प्रकाश जगताप उपस्थित होते. महाराष्ट्र शैली कुस्ती संघटनेच्या वतीने ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा भरविण्यात येते. या संघटनेच्यावतीने ६० वर्षांपासून हिंदकेसरी, रुस्तुम-ए-हिंद, भारत केसरी यांसारख्या स्पर्धा घेतल्या जातात. सासवड येथे होणारी ‘महाराष्ट्र केसरी’ पहिलवान प्रकाशबापू जगताप प्रतिष्ठान, संघटनेचे सचिव पहिलवान मोहन खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असल्याचे रोशनलाल यांनी सांगितले.

स्पर्धेला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व
महाराष्ट्र केसरी होणे हे प्रत्येक पहिलवानाचे स्वप्न असते. हा किताब जिंकणारा पहिलवान केवळ विजेता राहत नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान ठरतो. त्यामुळेच या स्पर्धेला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व आहे. त्यासाठी पहिलवान अनेक वर्षे कष्ट करतो. पहाटेचा सराव, आखाड्यातील मेहनत, शिस्तबद्ध जीवन, संयम आणि अपयशावर मात करण्याची जिद्द या सगळ्याचा शेवट ‘महाराष्ट्र केसरी’च्या मैदानात होतो. ही स्पर्धा फक्त ताकदीची नसून मानसिक ताकद, अनुभव आणि डावपेचांची देखील परीक्षा असते.

भारतीय शैली कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस गौरव रोशनलाल त्यांच्या परवानगीने पूर्वी मॅटवरील कुस्ती स्पर्धा काही आयोजकांनी घेतल्या होत्या. जे लोक आमच्या संघटनेबाबत शंका उपस्थित करतात त्यांनी स्वतःची अधिकृत परवानगी दाखवावी. आमचा संघ ६० वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्यामुळे लालमातीची परंपरा आमच्या संघाची आहे.
- नितीन बारणे, राज्य अध्यक्ष, कुस्ती महासंघ

स्पर्धेत विजयी होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ गटासाठी प्रथम क्रमांकाला थार चार चाकी मोटर. द्वितीयला सियारा चार चाकी मोटर, तृतीयला बुलेट, चतुर्थला दुचाकी वाहन. अशी सुमारे दोन कोटी रुपयांची बक्षीसे पहिलवानांना देण्यात येणार आहेत.
- प्रकाश जगताप, अध्यक्ष, प्रकाशबापू जगताप प्रतिष्ठान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धमकी कुणी दिली? व्हायरल क्लिपवर स्वतःच केला खुलासा; पुणे कनेक्शनही आले समोर

लग्न झालेलं असतानाही 24 वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते नाना पाटेकर; कोण होती ती अभिनेत्री?

Latest Marathi News Live Update : आजपासून नागपुरातील कचरा उचलण्यास होणार सुरुवात; १५०० कर्मचाऱ्यांनी पगार न दिल्याने केले होते कामबंद आंदोलन

Konkan Railway New Timetable : मॉन्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज, नवे वेळापत्रक लागू होणार; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

Farmer Loan Waiver: ४० लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफी; मात्र 'या' लाभार्थ्यांना लागू राहणार विशेष अट, फडणवीसांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT