पुणे

सासवड येथे तीन दिवसीय ‘जिओ फेस्ट’

CD

सासवड शहर, ता. २५ : वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड (ता. पुरंदर) येथे भूगोल विभागातर्फे तीन दिवसीय ‘जिओ फेस्टचे’ आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व कौशल्य विकासाच्या दृष्टीने ंआयोजित या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भूगोल विभाग प्रमुख डॉ. तुषार घोरपडे यांनी प्रास्ताविक करून जिओ फेस्टच्या आयोजनामागील उद्देश व उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
या जिओ फेस्टमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, फोटोग्राफी स्पर्धा, तसेच पोस्टर सादरीकरण असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात आले. भूगोल विषयातील समकालीन घडामोडी, पर्यावरणीय प्रश्न, हवामान बदल, शाश्वत विकास यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले. फोटोग्राफी स्पर्धेत नैसर्गिक व भौगोलिक वैशिष्ट्यांचे उत्कृष्ट छायाचित्रण सादर करण्यात आले.
याचबरोबर ‘ड्रोन तंत्रज्ञान आणि उपयोग’ व ‘एआय तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी’ या विषयांवर दोन विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. ‘ड्रोन तंत्रज्ञान आणि उपयोग’ या कार्यशाळेत डॉ. गणेश मधे यांनी भू-सर्वेक्षण, नकाशांकन, कृषी व आपत्ती व्यवस्थापनातील उपयोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ‘एआय तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी’ या कार्यशाळेत प्रा. संदीप शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या नव्या करिअर संधी व आवश्यक कौशल्ये याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, कला शाखा उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. बी. यू. माने, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. नरसिंग गिरी, विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूगोल विभाग प्रमुख डॉ. तुषार घोरपडे, तसेच प्रा. स्वाती भोसले, प्रा. सागर भोसले, प्रा. मनोज बोडरे, प्रा. रूपाली साठे, प्रा. कपिल कांबळे आणि प्रा. करिष्मा बरकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अनुजा सावंत या विद्यार्थिनीने केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur cooperative elections : गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

सासऱ्यांनी प्रॉपर्टीमधून बेदखल केलं, नणंदांनी केली कोर्ट केस ! मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात झालेली उलथापालथ

Latest Marathi News Live Update : बरसानाची जगप्रसिद्ध लाठमार होळी सुरू, लाखो भाविकांची हजेरी

Delhi Crime : राजधानी हादरली ! पत्नी अन् तीन मुलींची धारदार शस्त्राने गळे कापून हत्या, घटनेनंतर आरोपीने...

Shikhar Dhawan: कायदेशीर सामना धवनने जिंकला! पहिल्या बायकोकडून मिळणार ५.२ कोटी, आयेशासाठी वाढल्या अडचणी

SCROLL FOR NEXT