सासवड, ता. २४ : पुरंदर तालुक्यातील सिंगापूर येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छोटू शर्मा (रा. बिकोरहाट, जि. उत्तर दिनाजपूर, पश्चिम बंगाल) असे मृताचे नाव असून, सासवड पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारीला सिंगापूर येथील सुरेश गायकवाड यांच्या शेतात एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती पोलिस पाटील यादवेंद्र उरसळ यांना मिळाली. त्यांनी तातडीने सासवड पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला सासवड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हॉटेल मालक राजेंद्र मुळजे यांनी या घटनेची प्राथमिक माहिती दिली होती. सासवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रेय शेगर आणि सुनील चव्हाण पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.