सासवड शहर, ता. २५ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित पुरंदर हायस्कूल सासवडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा अर्थात एनएमएमएस या परीक्षेमध्ये आठवीचे एकूण ४४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २१ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या हे विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले, तर चार वर्षासाठी एकूण ४८ हजार शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे. शिष्यवृत्ती बरोबरच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी यातून होत आहे. परीक्षेच्या निकालावरून पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुले अभ्यासाकडे वळू लागले, मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया या परीक्षेत ११२ गुण मिळविणाऱ्या दामिनी गोविंद पवार हिच्या पालकांनी व्यक्त केली. या परीक्षेचे प्रमुख चंद्रकांत गांजरे व मार्गदर्शक नानासाहेब क्षीरसागर व सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे विद्यालयाचे प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी गुलाब पुष्प देऊन कौतुक केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे एनएमएमएस संस्था विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे अध्यक्ष विद्यासमिती, संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्रा. शुभांगी गावडे, सहसचिव प्रा. सीताराम गवळी, कौस्तुभ गावडे (सीईओ), पुणे विभाग प्रमुख प्रा. अनिल साकोरे, प्राचार्य इस्माईल सय्यद यांनी अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थी व त्यांचे गुण
दामिनी गोविंद पवार- ११२, स्वरांजली युवराज खोमणे -१०३, ईशा शांताराम झुरंगे- १००, शिवम सोमनाथ जगताप- ९६, आर्या सचिन बोरावके- ९४, अनुष्का बबन महाले- ९३, अनुष्का नागेश मुने- ९२, सिद्धी महादेव मस्के- ९१, व्यंकटेश माणिक इंगळे- ९१, संस्कृती हनुमंत मस्के- ९०, ओंकार शिवाजी सोनटक्के- ८५, प्रसिद्धी रवींद्र भोसले- ८३, जोया रियाज बागवान- ७९, दिव्या सुधीर गजीले- ७९, अक्षरा रमेश गीते- ७८, आर्यन गणेश बडदे- ७७, वैष्णवी बन्सीलाल पवार- ७६, श्रद्धा राहुल भोई- ७५, समृद्धी संतोष जगताप- ७४, आरती मिथुन गुंगे- ७०, शिवानी हरिभाऊ साबळे- ७०.
12629