पुणे

निधीअभावी सासवड पालिकेची कोंडी

CD

सासवड शहर, ता. २८ : सासवड नगर परिषदेस स्वच्छ भारत अभियानअंतर्गत बक्षिसांची रक्कम जाहीर झाली आहे; परंतु बक्षिसापोटी साडेसात कोटी रुपयांची इतकी रक्कम अद्यापपर्यंत मिळालेली नाही, तसेच १५व्या वित्तआयोग अंतर्गतसुद्धा सासवड नगरपरिषदेस मागील तीन वर्षांपासून निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे सासवड नगर परिषदेस आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च नगर परिषदेच्या तुटपुंज्या स्वउत्पन्नामधून करावा लागत आहे. तेव्हा निधी तातडीने नगर परिषदेला मिळावा, अशी मागणी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केली आहे.
सासवड शहराला पाणीपुरवठा करणारी वीर धरण उद्‍भव योजनेच्या प्रत्येक महिन्याच्या वीजबिलासाठीचा खर्च सुद्धा सासवड नगर परिषद स्वउत्पन्नामधून करावा लागत आहे. प्रशासकीय कालावधीमध्ये निधी मागणीबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरावा देखील केला आहे. सासवड नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित सदस्यांचे मंडळ अस्तित्वात आली. त्यांना या प्रकरणाबाबत माहिती देण्यात आली. सासवड नगरपरिषदेच्या स्वनिधीमधून होत असलेल्या खर्चाबाबतसुद्धा माहिती देण्यात आली. सदस्यांशी विचारविनिमय करून एक महिन्याचे वेतन अदा करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला व संबंधित ठेकेदारास एक महिन्याचे वेतनाचा धनादेश नगर परिषद फंडातून देण्यात आला. निधी मिळण्याबाबत शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार देखील करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमुळे माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तरी संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी शासन स्तरावरून निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. तरी शासन स्तरावरून निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराचे प्रलंबित देयके अदा करण्यात येतील, असे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT