पुणे

पुरंदर तालुक्यात ७ मार्चपासून समाधान शिबिराचे आयोजन

CD

सासवड शहर, ता. २: पुरंदर तालुक्यातील सहा गावात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत टप्पा क्रमांक एकमधील सहा शिबिरांचे तालुक्यात शनिवारपासून (ता. ७) आयोजन केल्याची माहिती पुरंदर तालुक्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुरंदर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे सहा विभागात आयोजन केले आहे. या शिबिराचे शनिवारी वाघापूर येथे आयोजन केले आहे, तर शनिवारी (ता. १४) शिवरी येथे, १० एप्रिल रोजी नारायणपूर, १७ एप्रिल रोजी परिंचे, ८ मे रोजी सासवड व १५ मे रोजी जेजुरी येथे शिबिराचे आयोजन केले आहे.
या शिबिरात महसूल विभागांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढण्यासाठी हे शिबिर घेतले जात आहे. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी पुरंदर तालुक्यात मंडलस्तरावर ही शिबिरे घेतले जातील, असेही तहसीलदारांनी सांगितले. तसेच, या शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे, जिवंत सातबारा मोहीम, शालेय दाखल्यांचे वितरण, विशेष अर्थसाह्य योजनांचा लाभ, पीएम किसान योजना, ॲग्रिस्टॅक योजना, सातबारा उतारे अद्ययावत करणे, नवीन अकृषक धोरणाची माहिती देणे, भोगवटा क्रमांक २च्या जमिनी नियमानुसार वर्ग १ करण्याबाबत कार्यवाही प्रक्रिया, तुकडेबंदी धोरणबाबत कार्यवाही प्रक्रिया आदी कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत. ग्रामस्थ, शेतकरी,विद्यार्थी यांनी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार राजपूत यांनी केले आहे.
निवासी तहसीलदार संंदीप पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले, तर उपस्थितात नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, प्राजक्ता दुर्गाडे, अजित इंगळे व सर्व पंचायत समिती सदस्य अमित झेंडे, माऊली यादव, माणिक निंबाळकर, स्मिता निगडे, मोनिका कांबळे, अर्चना कटके, सायली शिंदे आणि तलाठी, सर्कल ऑफिसर, पोलिस पाटील, रेशन दुकानदार व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Jalna–Jalgaon Project : जालना-जळगाव रेल्वेचा मार्ग मोकळा! ५,८०४ कोटींचा निधी मंजूर; लवकरच भूसंपादन सुरू

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : पुण्याच्या आनंदनगर उड्डाण पुलावर अपघात

SCROLL FOR NEXT