गराडे, ता. ३ : "गावकऱ्यांची एकजूट आणि सामूहिक सहभागामुळे गुरोळीत स्वच्छता, जलसंधारण आणि वृक्षारोपणाची लोकाभिमुख कामे प्रभावीपणे झाली आहेत. या लोकचळवळीमुळेच खऱ्या अर्थाने गावचा विकास झाला आहे," असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काढले.
गुरोळी (ता. पुरंदर) या गावाला मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली. या वेळी गावकऱ्यांनी गोरे यांचे बैलगाडीतून आणि ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक स्वागत केले. गोरे यांनी महादेव मंदिर परिसरातील वृक्षारोपण, पाणंद रस्ते, जलसंधारण कामे आणि ओपन जिमची पाहणी केली. जिल्हा परिषदेने दिलेल्या घंटागाडीचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर,यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रेय वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, पंचायत समिती सदस्य माऊली यादव, भाजपचे सचिन लंबाते, साकेत जगताप, गटविकास अधिकारी डॉ. प्रणोती श्रीश्रीमाळ, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, ग्रामपंचायत सरपंच रेणुका खेडेकर, उपसरपंच जीवन खेडेकर, माजी सरपंच हिरामण खेडेकर, रामचंद्र खेडेकर, प्रकाश खेडेकर, फ्रूट व्यापारी महादेव शिंगाडे, जगन्नाथ जगताप, माझी पंचायत समिती सभापती रमेश जाधव, अरुण महाडिक, ग्रामसेवक नीलिमा धाऊत्रे आदी उपस्थित होते. आत्तापर्यंत स्पर्धेदरम्यान केलेल्या गावांमधील कामाची चित्रफीत दाखवण्यात आली. उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजनांची येथे योग्य अंमलबजावणी झाल्याचे गोरे यांनी नमूद केले. ते म्हणाले, "राज्यातील प्रत्येक खेड्यात विकासाचा प्रवाह नेण्यासाठी हे अभियान राबवले जात आहे. ज्या गावांमध्ये मोठी लोकचळवळ उभी राहते, तिथे शासन निधीची कमतरता पडू देणार नाही. गुरोळीने राज्याचे पहिले बक्षीस मिळवावे, अशी माझी इच्छा आहे."
स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र राज्यामध्ये या स्पर्धेमधून ज्या गावचा प्रथम क्रमांक येईल त्या गावच्या सरपंचाला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत चहासाठी निमंत्रण करणार आहे.
- जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री
12667
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.