गराडे, ता. ७ : भिवरी जवळील माळवाडी (ता. पुरंदर) येथे शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मल्हारगड किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. तेथे शिवज्योत प्रज्वलित करून माळवाडी येथे आणण्यात आली.
गुरुवारी (ता. ५) लहान मुला- मुलींच्या चमचा लिंबू स्पर्धा व महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. शुक्रवारी (ता. ६) सकाळी श्रींच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. येथे गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था, संघटना, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवज्योतीचे स्वागत केले. सायंकाळी ५.३० ते ८ वाजेपर्यंत श्रींची व शिवज्योतीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. मिरवणुकीनंतर श्रींची महाआरती झाली. महाआरतीनंतर श्रीनाथ गोसावी बुवा तरुण मंडळाच्या सुप्रसिद्ध ढोल लेझीम खेळाचे आयोजन केले होते. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात आला. महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
12701-1