पुणे

सासवडमधील शाळांना एआय चार्टचे वाटप

CD

सासवड शहर, ता. ११ : सासवड (ता. पुरंदर) येथे मंगळवारी (ता. १०) महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी परिसरातील शाळांना एआय शिक्षणाचे मराठी चार्टचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे होते. यावेळी बोलताना वाघिरे महाविद्यालयाच्या एआय तांत्रिक विभागाच्या प्रमुख डॉ. प्रणिता शेरखाने यांनी सांगितले की, ‘‘१९व्या शतकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजात साक्षरतेची ज्योत प्रज्वलित केली. त्या काळात विशेषतः महिला साक्षरतेची मोठी गरज होती. मात्र, २१व्या शतकात समाजाने कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी वेगवान साक्षरता आत्मसात करणे हे जागृत समाजाचे प्रमुख लक्षण ठरणार आहे.’’
यावेळी बोलताना दिलीप निरगुडे म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षण प्रबोधनाच्या कार्याचा आधुनिक काळात एआयच्या माध्यमातून विस्तार होताना दिसत आहे. समाजाने या तंत्रज्ञानाचे योग्य आकलन करून त्याचा विधायक उपयोग केला, तर देशाच्या प्रगतीस नवे आयाम प्राप्त होईल.’’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे कार्याध्यक्ष सतीश पाटील यांनी केले. या कार्यक्रमास परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव ताकवले, कार्यवाह बाळासाहेब मुळीक, प्रा. डॉ. संदीप टिळेकर, प्रा. डॉ. सुभाष तळेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी गुरुकुल ॲकॅडमी, आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या विविध शाळा, सासवड नगरपालिका शिक्षण मंडळाचे इंदिरा गांधी विद्यालय, वीर बाजी पासलकर प्रशाला आदी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व शाळांना वसंतराव ताकवले यांच्या हस्ते एआय चार्टचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रदीप दुर्गाडे, राजेंद्र चांदगुडे, जीवन वाटेकर, सुहास कोकाटे, दीपाली दळवी, नीलम जाधव आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जगदीश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप टिळेकर यांनी केले, तर वसंतराव ताकवले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT