पुणे

पुरंदर तालुक्यात वणव्यामुळे निसर्गाची हाणी

CD

सासवड शहर, ता. ११ : पुरंदर तालुक्यात गेल्या १५ दिवसात मोठ्या प्रमाणावर वणवे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील निसर्गाची मोठ्या प्रमाणात हाणी होत आहे.
वन परिक्षेत्राधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री भालेराव यांनी डोंगराला लागणारे वणवे थांबवण्यासाठी शेतकरी व नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. असे मत इको फाउंडेशनचे तानाजी सातव यांनी व्यक्त केले. दिवे घाट, तसेच दिवेघाटाचा डोंगर परिसर, सासवडचा वाघ डोंगर व पायथा, भिवरी, नारायणपूर, पूरपोखर, सासवड आदी गावातून वणवे लागून निसर्ग संपत्तीची व प्राणीमात्रांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे शेतकरी संघटनेचे सल्लागार महादेव खेंगरे पाटील यांनी सांगितले. या संदर्भात आपण वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देणार असून, या वणव्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठीची कारवाई त्यांनी करावी, असेही खेंगरे पाटील यांनी सांगितले.
भिवरी गावाजवळ डोंगराला मंगळवारी (ता. १०) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वणवा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाऱ्याचे प्रमाण आणि रात्रीची वेळ असल्यामुळे वणवे आटोक्यात आणता आले नसल्याची खंत शिक्षक विलास रोकडे व राजेंद्र ताम्हाणे यांनी व्यक्त केली. वणव्या संबंधात वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

12735

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT