पुणे

सासवडमध्ये बौद्धिक संपदा हक्कांवर राष्ट्रीय वेबिनार

CD

सासवड शहर, ता. १३ : सासवड येथील सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी आणि पॉलिटेक्निक सासवड येथे बौद्धिक संपदा हक्क, नवीन आव्हाने आणि त्यावरील धोरणात्मक उपाय या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार उत्साहात पार पडला.
बौद्धिक संपदा हक्कांचे संशोधन, नवकल्पना आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी आपल्या नवकल्पनांचे संरक्षण करण्यासाठी पेटंट व बौद्धिक संपदा हक्कांविषयी जागरूक असणे आवश्यक असल्याचे समन्वयक डॉ. स्मिता पवार यांनी प्रास्ताविकातून सांगितले. बौद्धिक संपदा हक्कांचे संशोधन क्षेत्रातील महत्त्व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.
पहिल्या सत्रात बौद्धिक संपदा हक्क आणि पेटंट सहकार्य करार याबाबत डॉ. भास्कर इदगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. राजश्री गुडे गोवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या एचओडी यांनी शैक्षणिक क्षेत्रातील बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व : नवकल्पना निर्माण करणाऱ्यांना प्रेरणा या विषयावर मार्गदर्शन केले.
तिसऱ्या सत्रात पुण्याचे वरिष्ठ बौद्धिक संपदा व्यवस्थापक डॉ. माधव कुलकर्णी यांनी नवोन्मेषी दृष्टिकोनातून शोध आणि निर्मितीवर मार्गदर्शन केले. चौथ्या सत्रात बायोस्कॅप पेटंट सर्विसेस, हैद्राबाद तेलंगणाच्या संस्थापक सुजाथा मरिनगंटी यांनी मॉलिक्यूलपासून बाजार पेठेपर्यंतचा प्रवास : नवकल्पना, औषध पेटंट आणि सर्वांसाठी परवडणाऱ्या औषधांचे आव्हान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. औषध संशोधनापासून ते बाजार पेठेपर्यंतच्या प्रवासात पेटंटचे महत्त्व आणि सर्वसामान्यांना परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्यातील आव्हाने त्यांनी स्पष्ट केली.
प्रा. अंकिता जवळकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सागर भिसे, प्रा. विशाखा गायकवाड तसेच डॉ. स्मिता पवार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रा. विशाखा गायकवाड यांनी आभार मानले. या वेबिनारमध्ये प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT