पुणे

देशी बियाणांच्या संवर्धनासाठी जनजागृती

CD

सासवड शहर, ता. २१ : सासवड (ता. पुरंदर) येथील वाघीरे महाविद्यालयात गुरुवारी (ता. १९) देशी बियाणे बीज संकलन व प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी व शेतकऱ्यांना बियाण्यांचे संवर्धन, जतन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच बियाणांच्या प्रसाराबाबत जनजागृती करण्यात आली.

प्रदर्शनात विविध प्रकारच्या पारंपरिक बियाणे मांडण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून खळद ग्रामगौरव प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. सोनाली शिंदे, ग्राम गौरव प्रतिष्ठानचे समन्वयक प्रशांत बोरावके प्रमुख उपस्थित होते.

दरम्यान, प्रशांत शिंदे यांनी यावेळी देशी बियाणे व त्यातील जीवनसत्वे व पोषणमूल्ये यावर मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बी. यु. माने, गणित विभागाचे प्रमुख प्रा. विजय घारे आदींनी शेतकरी, विद्यार्थ्यांना देशी बियाणांचे महत्त्व पटवून दिले. प्रदर्शनास विद्यार्थी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली.
कार्यक्रमाचे आयोजन ग्राम गौरव प्रतिष्ठान व वाघीरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. शिवानी पवार हिने प्रास्ताविक तर प्रीती गिते हिने आभार मानले. माणसी मुणगेकर व मयुरी पवार यांनी सूत्रसंचालन केले.

देशी बियाण्यांचे महत्त्व अधोरेखित करताना जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक बियाण्यांचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त केली. भविष्यातील शाश्वत शेतीसाठी देशी बियाणे उपयुक्त आहेत.
- डॉ. सोनाली शिदे, विश्वस्त, खळद ग्रामगौरव प्रतिष्ठान


12781

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

महाराष्ट्राचे पोलिस आरोपीला पकडायला यूपीमध्ये पोहोचले, लोकांनी त्यांनाच चोर समजून चोपले; एका गोष्टीमुळे झाली गडबड

लोक मला आजही शिव्या देतात... अनाजी पंत साकारल्यानंतर महेश कोकाटेंनी व्यक्त केली खंत; म्हणतात-

कर्तृत्वशून्य नेत्यांना भोंदूबाबांचा आधार, हे नेते भोंदू; ठाकरेंचा टोमणा कुणाला? पाण्याच्या मुद्द्यावरही बोलले

IPL 2026 Marathi News: विराट कोहलीचा प्रतिस्पर्ध्यांना 'धडकी' भरवणारा Video; भाईचा विषयच हार्ड, षटकाराशिवाय नावच नाही

SCROLL FOR NEXT