पुणे

गुरोळीत २८ महिलांना शेळीचे वाटप

CD

गराडे, ता. २२ : गुरोळी (ता. पुरंदर) येथे महिला सक्षमीकरणासाठी सेवा सहयोग व शिवशक्ती सामाजिक सेवा ट्रस्टच्या वतीने २८ महिलांना शेळीवाटप करण्यात आले.
महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत गुरोळी, सिंगापूर आणि रिसे येथील महिलांना १२ मार्च रोजी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. यात शेळीचे व्यवस्थापन, खरेदी-विक्री आणि आयुर्वेदिक उपचार या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक महिलेला व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी एक शेळी देण्यात आली.
यावेळी तुषार निरगुडे, योगेश चपटे, संतोष खेडेकर, निखिल खेडेकर, सौरभ खेडेकर आदी उपस्थित होते.

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन
संस्थेतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी फळझाडे, खते आणि ठिबक संच मोफत दिले जातात. गांडूळ खत निर्मितीचे प्रशिक्षण आणि बेडचे वाटपही केले जाते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष खेडेकर यांनी दिली.


12797

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT