सासवड शहर, ता. २७ : सासवड (ता. पुरंदर) येथील सोनोरी रोड परिसरात ‘हिंदू संमेलन’ रविवारी (ता.२६) उत्साहात पार पडले. या संमेलनास ७०० ते ८०० हिंदू बांधवांनी हजेरी लावली.
कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजन, भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.
यावेळी स्वाती गोखले यांनी ‘अग्निहोत्र’ यज्ञाचे महत्त्व विशद केले. त्यानंतर महिलांनी रामरक्षा व स्तोत्र पठण केले. राजलक्ष्मी काटकर यांनी नृत्यातून देवीची स्तुती सादर केली.
संमेलनात मान्यवरांच्या हस्ते ‘देशी वृक्षांचे रोपण’ हे कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. समाजात हिंदू धर्म संपवण्याचे कटकारस्थान काही समाजकंटक करत आहेत. गरीब कुटुंबांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे, त्यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्ते नीलेश धायरकर यांनी मांडले.
संजय काटकर आणि प्रणव घोडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात मोहित जोशी यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सासवड पूर्व विभागातील सकल हिंदू समाजातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते व समितीच्या सेविकांनी केले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.