गराडे, ता. ४ : पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नियोजित शंभराव्या भव्य साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभर ९९ नांदी संमेलने आयोजित करण्यात येत आहेत. त्यापैकी सासवड येथील नांदी संमेलन येत्या १ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड, सोपाननगर व जेजुरी या तीन शाखांनी घेतला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन, जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सासवडच्या समृद्ध साहित्यिक व सांस्कृतिक वारशाला साजेसे आणि संस्मरणीय असे हे नांदी संमेलन व्हावे, असे आवाहन सुनील महाजन यांनी केले.
बैठकीस ॲड. दिलीप निरगुडे, प्रा. नानासाहेब पवार, प्रा. डॉ. नारायण टाक, युसूफ सय्यद, नंदकुमार सागर, ॲड. प्रकाश खाडे, ॲड. कलाताई फडतरे, हेमंत ताकवले, सुनील लोणकर, वसंत ताकवले, बाळासाहेब मुळीक आदी उपस्थित होते.
संमेलनात ‘राजकारणातील साहित्यिक’ या विषयावर परिसंवाद व प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार असून, महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपटही प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. संदीप टिळेकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.