पुणे

चिंचणी येथे पावसामुळे कोसळली काटेरी झुडपे

CD

गुनाट, ता. २५ चिंचणी (ता.शिरूर) परिसरात बुधवारी (ता.२४) सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे गुनाट चिंचणी रस्त्यावरील काटेरी झाडे झुडपे कोसळली. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. काटेरी झुडपांमुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

रस्त्यावर पडलेली झाडे त्वरित काढण्यात यावीत, अशी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ धुमाळ यांनी केली. गुनाट चिंचणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जुनी झालेली तसेच काटेरी झाडे आहेत. ही झाडे अनेकदा वाहतुकीला अडथळा ठरत होती. ही झाडे काढावीत, अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा केली होती. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले होते.
काटेरी झाडांमुळे प्रवास करताना अनेकांच्या गाड्या पंक्चर होत होत्या. त्यामुळे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होत होता. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, झाडे झुडपे हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहेत. अशा काही घटना घडल्यास नागरिकांनी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा. जेणेकरून तातडीने कार्यवाही करता येईल.
00074

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : भाषेची सक्ती केल्यास आम्ही शक्ती दाखवू - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT