पुणे

यांत्रिकीसह फायबर बोटी उद्ध्वस्त

CD

गुनाट, ता. २६ : घोड धरणातील बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या मुजोर वाळू माफियांवर शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील महसूल विभागाच्या पथकाने संयुक्त कारवाई करत सात यांत्रिक बोटी व सहा फायबर बोटी स्फोटकांच्या साह्याने फोडण्यात आल्या. मंगळवारी (ता. २५) ही कारवाई करण्यात आली.
घोड धरणातील वाळू माफियांवर कारवाई करूनही वाळू माफिया पोलिस व महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू उपसा करत होते. शिरूर प्रशासनाच्या कारवाई दरम्यान हे वाळू माफिया श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीचा आसरा घेत असल्याने अनेकदा या कारवाईवर मर्यादा येत होत्या. त्यामुळे शिरूर व श्रीगोंदा तालुक्याच्या महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी (ता. २५) हे संयुक्त पथक सुसज्ज अशा यांत्रिक बोटीच्या साहाय्याने घोड नदीच्या पात्रात उतरले. या कारवाईचा सुगावा लागताच वाळू माफियांनी आपल्या बोटी श्रीगोंदा तालुक्याच्या माठ राजापूर या गावांच्या हद्दीत पळविल्या. मात्र, कठोर कारवाई करायचीच या उद्देशाने नदीपात्रात उतरलेल्या या पथकाने श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत जाऊन, बोटींचा शोध घेत या बोटी स्फोटकांच्या साह्याने उडवून दिल्या.

दरम्यान, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, श्रीगोंदाचे तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, मंडलाधिकारी नंदकुमार खरात, तलाठी हर्षल साळवे, सिद्धार्थ वाघमारे, राजेंद्र बढे, श्रीकांत आढाव, श्रीगोंदा तालुक्यातील मंडलाधिकारी राजेंद्र ढगे, तलाठी विनोद जाधव, महेश धुमाळ, महेंद्र शिंदे, बाबासाहेब भव्य, राजीव सोळुंके, प्रशांत गौडकर, राजेंद्र भुतकर, प्रतीक घावटे आदींनी सहभाग घेतला होता.

कारवाईचा धडका तरी बेफाम वाळू माफिया
शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत तीन वेळा वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, तरीही मुजोर वाळू माफियांनी अवैध वाळू उपशाचा धडाकाच लावला होता. मात्र, या तीन महिन्यांत बाळासाहेब म्हस्के यांच्या पथकाने जवळपास २५ बोटी उद्ध्वस्त करत वाळू माफियांचे कंबरडेच मोडले आहे.

प्रशासनाला वारंवार आव्हान देण्याचे काम वाळू माफियांनी करू नये. वाळू माफियांवर यापुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
- बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार, शिरूर
0298

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT