गुनाट, ता. २७ ः दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले असताना देखील आदेशाचे उल्लंघन करत आपल्या मुळ गावी निमोणे (ता. शिरूर) येथे आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने करवाई करत ताब्यात घेतले आहे. रोहित प्रमोद कर्डिले व दीपक दत्तात्रेय जाधव असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहे.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार सागर शहाजी धुमाळ व संजू ज्ञानदेव जाधव यांनी या संदर्भात शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पुणे जिल्हा व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले कर्डिले व जाधव हे दोघे आदेशांचे उल्लंघन करून गावात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ यांनी गावात जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेले असताना देखील ते शासनाकडून कोणतीही परवानगी न घेता गावात आल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना शिरूर पोलिसांच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.