गुनाट, ता. ३ : करडे (ता. शिरूर) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष देशमुख तर उपाध्यक्षपदी काशिनाथ बांदल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष आनंदा देशमुख व उपाध्यक्ष एकनाथ घायतडक यांनी राजीनामा दिल्याने हे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडीसाठी जिल्हा परिषद सदस्या वृषाली वाळके यांच्या नेतृत्वाखाली नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सोसायटी संचालकांची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्षपदी देशमुख यांनी निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत पिसाळ यांनी काम पाहिले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, बबन वाळके, गणेश रोडे, शरद भोसले, राजेंद्र गायकवाड, कैलास वाळके, बाळासाहेब वाळके, लक्ष्मण वाळके, विशाल घायतडक यांसह गावातील विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
00339, 00340
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.