पुणे

जिल्ह्यातील ३०३ शाळा सौर ऊर्जेने उजाळणार

CD

संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. २५ : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३०३ शाळांचे सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकास्तरावरील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी संबंधित शाळांची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच या शाळांवर सौर पॅनल उभे केले जाणार आहे. त्यातून या शाळा सौर ऊर्जेने उजळणार आहेत
राज्यासह जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या वीज बिलांचा प्रश्न नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यामुळे शाळांचे वीज बिले थकल्याने वीजपुरवठा खंडित होऊन शाळा अंधारात राहतात. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सौरऊर्जा पॅनेल बसवण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३०३ शाळांची निवड केली आहे. संबंधित शाळांची पाहणी करून त्याबाबतचे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते अहवाल आल्यानंतर तत्काळ पुढील कार्यवाही होणार आहे. त्यामुळे शाळांच्या वीज पुरवठ्यासह वीज बिलांचा प्रश्नही सुटणार आहे. याबाबत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.

सौर ऊर्जा पॅनेलसाठी तालुकानिहाय निवडलेल्या शाळांची संख्या व अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या
आंबेगाव- २३ - ५
बारामती- २१ - ४
भोर- २४ - ४
दौंड- २० - ४
हवेली- १९ - ५
इंदापूर- २६ - ४
जुन्नर- ३२ - ५
खेड- ३५ - ५
मावळ- २४ - ४
मुळशी- २० - ३
पुरंदर- १८ - ५
शिरूर- २५ - ३
वेल्हे- १६ - ३
एकूण- ३०३ - ५४

शाळांमध्ये सौर ऊर्जा वापराचे फायदे
• सौर ऊर्जा पॅनेलमुळे शाळेचा वीज बिलाचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
• बचत झालेला निधी शिक्षणाच्या इतर क्षेत्रांमध्ये वापरणे शक्य होईल
• सीसीटीव्ही कार्यान्वित राहतील
• संगणक प्रयोगशाळांमध्ये खंड पडणार नाही
• सौर ऊर्जा स्वच्छ आणि नूतनीकरणक्षम आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण रक्षणास फायदा
• ग्रामीण भागातील विजेची सतत समस्या असल्यास, सौर ऊर्जा शाळांना अखंडित वीजपुरवठा देईल
• विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण देण्यासाठी वातावरण तयार होईल.

जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा खंडित होऊन शाळा अंधारात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याच्या निर्णयाची कार्यवाही सुरू केली आहे. सौर ऊर्जा पॅनेलमुळे जिल्हा परिषद शाळांचे आर्थिक, पर्यावरणीय व सामाजिक फायदे होतील. यासह सीसीटीव्ही, संगणक प्रयोगशाळा यांच्यामध्ये खंड पडणारा नाही. त्यामधून शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळेल.
- संजय नाईकडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

शाळांच्या वीज बिलांचा प्रश्न प्रत्येक वेळी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक शाळांवरती सौर पॅनेल उभा करण्याचा उपक्रम दिलासादायक आहे. सौर ऊर्जेचा वापर करून शाळांमधील संगणक, प्रोजेक्टर, फॅन आणि लाइट यांसारख्या सुविधांचा अखंड वापर शक्य होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शिक्षण देण्यासाठी वातावरण तयार होईल.
- अजिंक्य खरात, गटशिक्षणाधिकारी, इंदापूर

जिल्हा परिषद शाळांवर सौर ऊर्जा पॅनेल बसविल्यामुळे अनेक फायदे होऊ शकतात. त्यामुळे केवळ शाळांचा वीज खर्च कमी होतो असे नाही, तर पर्यावरणपूरक विकासालाही चालना मिळते. विद्यार्थ्यांमध्ये हरित ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देता येईल. यासह शाळा सौर ऊर्जेच्या उपयुक्ततेचे उदाहरण बनतील.
- दत्तात्रेय ठोंबरे, प्राथमिक शिक्षक, इंदापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Jalgaon News : झाडांची कत्तल अन् तलावाची हानी! मेहरूण तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

Dombivli: क्रिकेट खेळताना चिमुकल्यावर काळ ओढवला; हसत्याखेळत्या कुटुंबाची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त, मुंबईत नेमकं काय घडलं?

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

SCROLL FOR NEXT